‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करावे- स्नेहलता कोल्हे

‘हर घर तिरंगा’ अभियान यशस्वी करावे- स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

भारतीय स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने हर घर तिरंगा मोहिमेस शासनाने सुरूवात केलेली आहे. देशातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज लावायचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे. याच अभियानामध्ये भारतीय जनता पक्ष सहभाग घेऊन या मोहिमेचे उद्दिष्ट पुढे घेऊन जायचे ठरवलेले आहे. तरी सर्वांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन आपण राष्ट्रध्वज दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा मोहीम राबवायची असल्याचे प्रतिपादन भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याबाबत एक कृतीशील कार्यक्रम आखला आहे. प्रत्येक बुथवर तिरंगा कार्यक्रम 9 ते 11 ऑगस्ट या कालावधीत देशभक्तीपर गीत, तिरंगा यात्रा, सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग लावून देशभक्तीचा प्रचार व वातावरण निर्मिती करावी. 11 ते 13 ऑगस्ट या कालावधीत रघुपती राघव राजाराम भजन, वंदेमातरम संपूर्ण गीत लावून प्रत्येक प्रभाग व गावात प्रभात फेरी काढावी. सर्व निवासी संघटना, युवा संघटना, साधू-संतांचे मत व इतर सामाजिक संघटनाच्या कार्यालयांवर राष्ट्रध्वज कार्यक्रमापूर्वी सर्वांशी संपर्क कार्यक्रमाचे नियोजन करावे, सर्व पोस्ट ऑफिस, भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून चार प्रकारच्या वेबसाईटवर आणि अन्य दुकानांमध्ये उपलब्ध असेल.

राष्ट्रध्वज लवकरात लवकर खरेदी करावेत तसेच नागरिकांनाही राष्ट्रध्वज खरेदी करण्यास प्रोत्साहित करावे. युवा मोर्चातर्फे 10, 11 आणि 12 ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा सायकल यात्रा काढावी. मंडल स्तरापर्यंत किमान तीन सदस्यीय समिती गठित करावी आणि प्रभात फेरी, तिरंगा फडकवणारे प्रत्येक घर आणि राष्ट्रध्वज यांचे फोटो व व्हिडियो सोशल मीडियाद्वारे व्यापक प्रसिध्दीची योजना तयार करावी. जिल्हा, मंडल, शक्ती केंद्र व बूथ स्तरावर प्रत्येक ठिकाणी तिरंगा अभियान यशस्वी करावे.

याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, बाळासाहेब निकोले, बापूसाहेब सुराळकर, संदीप गायकवाड, गोरख आहेर, चंद्रकांत शिवरकर, सचिन कोल्हे, सुभाष गायकवाड, संतोष सुराळकर, विजय कोर, सुरेश शिंदे, शिवाजी दवंगे, अतुल सुराळकर, अशोक भनगडे, किरण गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, रवींद्र काकड, किशोर कोल्हे, दत्तात्रय सुराळकर, भास्कर आहेर, संतोष सुराळकर, शंकर पाईक, अनिल पाईक, मारुती पाईक, दिपक कोल्हे, प्रदीप आहेर, उमेश कोकाटे, अमोल झावरे, उत्तम पाईक, बाबासाहेब गायकवाड, निलेश भाकरे, विजय नागरे, रमेश वाघ, पी. एस. डहाके, रामराव डुंबरे, आर. बी. निकम, वैशाली कोल्हे, वंदना गायकवाड, मोनाली आहेर, संगिता चिंचोले, उषा चिंचोले, निता गायकवाड, पी. एल. वाघ, निफाडे एस. एस., वाघ एस. आर., निलिनी झावरे, कल्पना कळसकर, अनिता मुरकुटे, छाया कांबळे, कैलास शिंदे, नाना डोळस, स्वाती आढाव, अलका कदम, आयुबभाई शेख, संतोष शिंदे यांच्यासह विविध स्तरातील नागरिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com