सुप्यात तिरंंगा जनजागृती फेरी शेकडो विद्यार्थी सहभागी; पहा फोटो

सुप्यात तिरंंगा जनजागृती फेरी शेकडो विद्यार्थी सहभागी; पहा फोटो

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने सुपा शहरातुन न्यु इंग्लिश स्कुल सुपा व जिल्हा परिषद शाळा सुपा यांनी तिरंगा जनजागृती फेरी काढली यावेळी शेकडो विद्यार्थी सहभागी झाल्याने संपूर्ण सुपा शहर तिरंगामय झाले होते.

घरो घरी तिरंगा या अभियानाअंतर्गत शासनाच्या आदेशानुसार 13 ते 15 ऑगस्ट 2022 या काळात घरो घरी तिरंगा फडकला जाणार आहे. त्याची पुर्वतयारी म्हणून सुपा येथील शालेय विद्यार्थ्यांनी सर्वांत पुढे ढोल, लेझीम पथक, झाज पथक त्यानंतर महापुरुषाच्या वेशातील विद्यार्थी व त्यानंतर विविध देशप्रेमाचे सुविचार लिहीलेले बोर्ड हातात घेतलेले विद्यार्थी त्यावर देशाच्या पराक्रमाचे देशाच्या प्रगतीचे एकतेचे संदेश लिहलेले फलक घेऊन विद्यार्थी विविध घोषणा देत ग्रामफेरी काढली.

संपूर्ण गावाला फेरी घातल्यानंतर बाजारतळ मैदानावर लेझीम झांज पथकाने विविध कवायती केल्या. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी सुपा शहर दणदणून गेले तर शेकडो विद्यार्थी तिरंगे झेंडे घेऊन शहरातुन फेरी मारत असतांना संपुर्ण गाव तिरंगामय झाले होते. आजच्या विद्यार्थ्यांच्या तिरंगा फेरीमुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत परिसरात तिरंगामय वातावरण तयार झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com