पावसाच्या दडीमुळे आदिवासी भागातील शेतकरी संकटात

पावसाच्या दडीमुळे आदिवासी भागातील शेतकरी संकटात

अकोले |प्रतिनिधी| Akole

चालू हंगामात (current season) वेळेवर सुरू झालेल्या पावसाने अचानक दडी मारल्याने आदिवासी पट्ट्यातील गावांमध्ये भात पिकांची (rice crops) रोपे सुकून चालली आहे. मान्सूनपूर्व आलेल्या पावसाने शेतकरी (Farmers) जोमाने कामाला लागला होता. भात (Rise), नागली (Nagli), वरई (Varai) यांची मोठ्या प्रमाणावर रोपे टाकण्यात आली. परंतु वेळेवर पावसाने दडी मारल्याने ही रोपे आता सुकू लागले आहेत.

शेतकरी चिंतातुर (Farmers worried) झालेला असून जर येत्या दोन-तीन दिवसात पाऊस पडला नाही तर पुन्हा बियाणे पेरावे लागेल (seeds will have to be sown again). हुकमी आणि हक्काचे असलेले भात पीक हातचे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या भीतीने शेतकरी सर्वदूर चिंतातुर झालेला आहे. चातकाप्रमाणे पावसाची वाट बघत असून पाऊस वेळेत पडल्यास भात रोपांची पुनर्लागवड जोरात सुरू होऊ शकते असे चित्र आहे.

चालू हंगामात मान्सूनपूर्व पडलेल्या पावसाच्या (pre-monsoon rain) भरवशावर शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर बियाणे (Seeds) पेरून खरीप हंगामाची जय्यत तयारी केली होती. रोपांची उगवण (Crops) सुंदर पद्धतीने झाली होती. अचानक पावसाने दडी मारल्याने सर्वत्र नैराश्याचे आणि काळजीचे वातावरण पसरले आहे.

अकोले (Akole) तालुक्यातील आदिवासी पट्ट्यामध्ये (tribal belt) बहुतेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड केली जाते. त्यासाठी जागोजागी राबनी करून रोपे टाकण्यात आलेली आहेत. शेतकरी अत्यंत कष्टाने व मेहनतीने रोपवाटिका (Nursery) तयार करून भाताचे पुर्नलागवड करत असतो. त्याचबरोबर इतरही पिकांची तयारी केली जाते यामध्ये प्रामुख्याने भात, नागली, वरई, तूर, मूग, उडीद, खुरसणी, जवस या पिकांचा समावेश होतो. या भागासाठी हा हंगाम अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कुटुंबासाठी लागणारे बहुतेक अन्नधान्य याच हंगामात निर्माण होते.

तसेच या हंगामावर येणार्‍या पिकांच्या आधारेच तिथली अर्थव्यवस्था फिरत असते. निसर्गाच्या कृपेने वेळेत पाऊस सुरू होऊन सर्व पिकांना जीवदान मिळावे यासाठी शेतकरी आकाशाकडे नजर लावून बसला आहे. दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. अगोदर करोनाचे संकट (crisis of Corona) आणि त्यानंतर निसर्गाने केलेली कुरघोडी या दुहेरी संकटात इथली जनता सापडली आहे. हवामान बदलाचा मोठा फटका (big blow of climate change) चालू हंगामात बसताना दिसत आहे. जागतिक तपमान वाढीमुळे ही संकटे या पुढे येत राहतील असे भाकीत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. क्लायमेट स्मार्ट शेती धोरण जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. आपल्या मातीत हेच प्रयोग राबवले गेले पाहिजेत तरच शेतकरी आणि शेती वाचू शकते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com