आदिवासी विकास परिषदेच्या वतीने विनय सावंत यांचा निषेध

आदिवासी विकास परिषदेच्या वतीने विनय सावंत यांचा निषेध

राजूर |वार्ताहर| Rajur

अकोले तालुका एज्युकेशन संस्था कार्यकारणी बाबत पत्रकार परिषदेत राष्ट्र सेवादलाचे विनय सावंत यांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांच्याबद्दल बेताल वक्तव्याचा आदिवासी विकास परिषदेने निषेध केला असून त्यांच्या निषेधार्थ दि. 30 एप्रिल रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विजय भांगरे यांनी दिली.

आदिवासी विकास परिषदेची काल राजूर येथे बैठक झाली. अध्यक्षस्थानी खडकी सहकारी संस्थेचे अध्यक्ष सी. बी. भांगरे होते. या माजी पोलीस अधिकारी पांडुरंग भांगरे, राजूर माजी सरपंच गणपत देशमुख, सुरेश भांगरे, संतोष बनसोडे, गोकुळ कानकाटे, रामनाथ भांगरे, श्रावण भांगरे, बारी गावचे सरपंच तुकाराम खाडे, गणपत भांगरे, भरत घाणे, चंद्रकांत गोंदके, पांडुरंग खाडे, अनंत घाणे, सखाराम भांगरे, बाळू बुळे, संपत झडे, दगडु पांढरे, सयाजी अस्वले, विजय भांगरे, सोमा अस्वले, चिंधू थिगळे, काशिनाथ साबळे, कमलताई बांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रास्तविकात सी. बी. भांगरे यांनी अकोले तालुक्यात माजी मंत्री पिचड यांनी राजकारण, समाजकारण केले, संस्था उभ्या केल्या मात्र अलीकडे शेंबडी पोरंही राजकीय द्वेष व व्यक्ती द्वेषातून खोटे आरोप करून त्यांचेवर टीका करत आहे. विनय सावंत यांच्या संस्थेला शाळा मान्यता देण्यात आली ती पिचडांची कृपा आहे. सावंत यांचेवर उपकार करूनही ते चुकीचे गलिच्छ आरोप करून पिचड यांची बदनामी करत असतील तर भविष्यात जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिला. तर तुकाराम खाडे यांनी बारी ची शाळा पिचड यांनी मान्यता दिली त्याचा मी साक्षीदार आहे त्यात किती आदिवासी संचालक आहे. याचा हिशोब घ्यावा लागेल.

संतोष बनसोडे यांनी राजूर येथील शाळा, वाचनालय त्याचे अनुदान जागा, पगार यात झालेला गैरव्यवहार जनतेसमोर मांडवा लागेल असे सांगितले तर सुरेश भांगरे यांनी पिचड यांनी आदिवासींचे दैवत आहे त्यांना बदनाम कराल तर आदिवासी समाज पेटून उठेल असा इशारा दिला.

पांडुरंग भांगरे यांनी तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी विकास कामाकडे लक्ष्य द्यावे, वैयक्तिक द्वेष राजकारण करू नये व आपल्या कार्यकर्त्यांना आरोप करताना तोंडाला लगाम घाला असे सुनावले.

विजय भांगरे यांनी 30 तारखेला आंदोलन होणार असून त्यात विनय सावंत यांना उत्तर देऊ असे सांगितले. सयाजी अस्वले यांनी आभार मानले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com