आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे वाटप

आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे वाटप

आश्वी |वार्ताहर| Ashwi

केवळ निवडणूका आल्या म्हणून, काम करण्याची पध्दत विखे पाटील परिवाराची नाही. जनतेच्या सुखदुखामध्ये सहभागी होवून शासकीय योजनांचा लाभ जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून मिळवून देण्याचा प्रयत्न हा सातत्याने सुरु असतो. करोना संकटातही कुटूंबाप्रमाणेच जनसेवा फौंडेशन समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले, असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

एकात्मिक आदिवासी विभाग आणि जनसेवा फौंडेशनच्या वतीने शेडगाव येथे आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे वाटप सौ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या अ‍ॅड. रोहीणीताई निघुते, दिनशे बर्डे, पंचायत समिती सदस्य गुलाबराव सांगळे, आदिवासी विभागाचे समन्वयक सुरेश राठोड, आश्वीनी बँकेचे संचालक संपतराव सांगळे, सोसायटीचे चेअरमन रमेश नागरे, सरपंच राजेंद्र बढे, दिलीपराव नागरे, सखाहरी नागरे यांच्यासह ग्रामस्थ आणि आदिवासी बांधव उपस्थित होते.

सौ. विखे पाटील म्हणाल्या की, समाजातील सर्वच घटकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून शिर्डी मतदार संघात जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून काम सुरु असते. आदिवासी बांधवांकरीता स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष म्हणून काम करताना शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन, या योजनांची लोकाभिमुखता वाढविल्यामुळेच योजनांचे महत्व लोकांना कळले. शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक माणसाला मिळाला पाहिजे ही भूमिका ठेवूनच शिर्डी विधानसभा मतदार संघात काम होत असल्याने योजनांच्या अंमलबजावणीत शिर्डी विधानसभा मतदार संघ पहिल्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

Related Stories

No stories found.