वृक्षारोपण काळाची गरज - माजी खा. तनपुरे

वृक्षारोपण काळाची गरज - माजी खा. तनपुरे

वळण |वार्ताहर| Valan

आजच्या काळात वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल राहतो व झाडामुळे पुरेसा प्राणवायू मिळतो, असे प्रतिपादन माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी केले.

राहुरी तालुक्यातील पिंपरी वळण येथे अडबंगनाथ संस्थानचे मठाधिपती अरुण गिरीजी महाराज, माजी खासदार बापूसाहेब तनपुरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी माजी खा.तनपुरे बोलत होते. यावेळी राधेश्याम लहारे, निमसे, आबासाहेब लहारे, रवींद्र मोरे आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी महंत अरुणगिरी महाराज म्हणाले, निसर्गातील प्राण्यांना व पक्षांना अन्न व आश्रयासाठी झाडाशिवाय पर्याय नाही. त्याकरीता प्रत्येक माणसाने वृक्षाचे संवर्धन केले पाहिजे. राधेश्याम लहारे यांनी आपल्या वस्तीवर वृक्षारोपण केले. त्यांचा आदर्श घेऊन आपापल्या घरासमोर, शेताच्या बांधावर वृक्षारोपण केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मियासाहेब पतसंस्थेचे अध्यक्ष शामराव निमसे, सुनील अडसुरे, राहुरी तालुका वारकरी सांप्रदायाचे अध्यक्ष बाळकृष्ण बानकर, पंचायत समितीचे सदस्य सुरेश बानकर, युवासेना तालुकाध्यक्ष धनंजय आढाव, सूर्यभान आघाव, भाऊसाहेब राजळे, कृष्णा जाधव, शिवाजी शिंदे, साईराम बानकर, बाबासाहेब ढवळे, नारायण शिंदे, नंदूभाऊ तनपुरे, बाबासाहेब चौधरी, नामदेवराव आघाव, दिलीपराव लोखंडे, प्रमोद सुराणा, विलास उदावंत, संजय आडसुरे, ऋषिकेश येवले, रखमाजी जाधव, भाऊसाहेब लांडे, भीष्माचार्य जाधव, मधुकर तारडे, सुधाकर झरे, दत्तात्रय खुळे, वळण सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर खुळे, अनिल राजदेव, संजय शेळके, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. आबासाहेब दादासाहेब लहारे, प्रमोद लहारे यांनी आभार मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com