जिल्ह्यात १७५१ रुग्णांवर उपचार सुरु

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७४ टक्के
जिल्ह्यात १७५१ रुग्णांवर उपचार सुरु

अहमदनगर l Ahmednagar

जिल्ह्यात आज ३३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६० हजार ३१४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.७४ टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३०७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७५१ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये २८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९७ आणि अँटीजेन चाचणीत १८२ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०५, राहुरी ०१, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०१, कँटोन्मेंट ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३७, अकोले ०३, जामखेड ०१, कर्जत ०३, नगर ग्रामीण १०, नेवासा ०६, पारनेर ०३, पाथर्डी ०२, राहाता ०७, राहुरी ०६, संगमनेर ०९, शेवगाव ०१, श्रीरामपूर ०८ आणि कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज १८२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ०९, अकोले ०९, जामखेड ०९, कर्जत ०४, कोपरगाव २०, नगर ग्रामीण ०१, नेवासा २३, पारनेर २२, पाथर्डी १३, राहाता १०, राहुरी ०९, संगमनेर १९, शेवगाव ०७, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर १४ आणि कॅन्टोन्मेंट ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४८, अकोले २६, जामखेड १३, कर्जत ११, कोपरगाव २२, नगर ग्रा.०७, नेवासा २०, पारनेर २६, पाथर्डी ३१, राहाता २०, राहुरी २१, संगमनेर ४०, शेवगाव १८, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर २२, कॅन्टोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील स्थिती

बरे झालेली रुग्ण संख्या :६०३१४

उपचार सुरू असलेले रूग्ण : १७५१

मृत्यू :९३३

एकूण रूग्ण संख्या : ६२९९८

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com