लम्पींवरील उपचार भोवला : राहात्याच्या तिघा खासगी पशू वैद्यकीय सेवा देणार्‍यांना नोटीसा

पशूसंवर्धन विभागाची कारवाई
लम्पींवरील उपचार भोवला : राहात्याच्या तिघा खासगी पशू वैद्यकीय सेवा देणार्‍यांना नोटीसा

अहमदनगर (प्रतिनिधी)

लम्पी स्किन आजारावर शासकीय पशू वैद्यकीय अधिकारी अथवा संस्था यांना न कळविता परस्पर उपचार करणार्‍या राहाता तालुक्यातील तिघा खासगी पशू वैद्यकीय सेवा देणार्‍यांना जिल्हा पशूसंवर्धन विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

तसेच येत्या तीन दिवसांत खुलास न केल्यास पशू वैद्यकीय कायदा आणि संसर्गजन्य आजार कायद पशू 2009 (कलम 32 नूसार) कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतची नोटीस जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनिल तुंबारे आणि जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर यांच्या संयुक्त सहिने काढण्यात आली आहे. यात राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथील प्रदीप झोडगे, चव्हाण (पूर्ण नाव माहित नाही), दिपक डांगे हे कोर्‍हाळे गाव व परिसारात खासगी पशू वैद्यकीय सेवा पूरवतात.

दरम्यान, या तिघांनी जनावरांना होणार्‍या लम्पी या संसर्ग आजाराबाबत जवळाच्या शासकीय पशू वैद्यकीय अधिकारी अथवा संस्था यांना कळवणे आवश्यक होते. मात्र, गेल्या पाच ते सहा दिवंसापासून या तिघांनी शंकर कणसे, माधव निवृत्ती कणसे, सोमनाथ चांगदेव कालेकर, दौलत तुकाराम कालेकर, ताराबाई गोरक्ष कालेकर, यादव तुकाराम कालेकर यांच्या लम्पीग्रस्त गोवंशीय प्राणी (गाय) यांच्यावर गुपचूप उपचार केले. यातील ताराबाई कालेकर यांची गाय दगावाली आहे.

याला हे तिघे पशूसेवा देणारे कारणीभूत असून यामुळे त्यांनी पशू वैद्यकीय कायदा आणि संसर्गजन्य आजार कायद पशू 2009 उल्लांगण केले आहे. यामुळे संबंधीत तिघांना नोटीस काढण्यात आली असून तीन दिवसांत खुलासा न केल्यास पशूसंवर्धन कायद्यानूसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com