प्रवासात महिलेचे दागिन्यासह रोख रुपये 64 हजाराची चोरी

प्रवासात महिलेचे दागिन्यासह रोख रुपये 64 हजाराची चोरी

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील महिला प्रवास करुन शिर्डी उतरली असता तिची पर्सची चोरी झाली. या पर्समधील 55 हजाराचे दागिन्यासह 9 हजार रुपये रोख असा 64 हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणयात आला आहे.

पाचोरा येथील महिला शिल्पा प्रदीप चिंचकर हि महिला पाचोरा ते शिर्डी प्रभात दुध डेअरीचा बोलेरो पिकअप एमएच 17 बी वाय 3366 ने प्रवास केला असता शिर्डी येथे दुपारी उतरलो असता पर्स मिळुन नाही. त्यात 55 हजाराचे सोन्याचे दागिने 9 हजार रूपये रोख होते उतरल्यावर मोठा शोध घेऊन सुद्धा ऐवज मिळुन आला नाही.

या वाहनात प्रवास केला त्या वाहनावर प्रभात डेअरी असे नाव होते त्यात कपड्यावर वरिल नाव असलेला तरुण होता त्याचे नाव अश्पाक शेख असे आहे. त्याने सांगितले माझ्या परवानगीशिवाय चोरीच्या इराद्याने कोणीतरी चोरी केली अशी तक्रार या महिलेने दिल्याने शिर्डी पोलिसांनी भादवि 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास शिर्डी पोलिस करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com