प्रवासासाठी 20 दिवसांत 17 हजार जणांनी काढले ई-पास

37 हजार जणांनी केले अर्ज; 20 हजार रद्द
प्रवासासाठी 20 दिवसांत 17 हजार जणांनी काढले ई-पास
ई-पास

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ई-पाससाठी गेल्या 20 दिवसांत पोलिसांकडे 37 हजार जणांनी अर्ज केले असून यातील 17 हजार जणांना ई-पास दिला आहे. योग्य कारण नसल्याने व आवश्यक ती कागदपत्र न जोडल्याने 20 हजार जणांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. जिल्हा अंतर्गत व जिल्ह्याच्या बाहेर प्रवासासाठी प्रशासनाने ई-पास सक्तीचा गेला आहे.

दिवसेंदिवस करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू केले आहे. या निर्बंधात 1 जूनपर्यंत वाढ केली आहे. 23 एप्रिल पासून प्रवासासाठी ई-पासची सक्ती केली आहे. आवश्यक कारण असेल तरच पोलिसांकडून पास देण्यात येतो. हॉस्पिटलमध्ये अथवा जवळच्या नातेवाईकाच्या अंत्यविधीला जायचे असेल तर पोलीस तात्काळ पासला मंजुरी देतात. आवश्यक ती कागदपत्र जोडलेले असेल तर 12 तासांच्या आत पास दिला जातो. अर्ज करणार्यांपैकी बहुतांशी जण लग्नाला जायचे आहे.

नातेवाईकांना भेटायला जायचे आहे. अशी शुल्लक कारणे नमूद करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर विभागामार्फत अर्जाची छाननी करून ई-पास दिला जातो. दिवसाला साडेपाचशे ते सहाशे पास सध्या दिले जात आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com