ट्रॅव्हल बसच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

ट्रॅव्हल बसच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रॅव्हल बसने दुचाकीस्वारास जोरदार धडक (Travel Bus and Bike Accident) दिल्याने मोटारसायकलस्वार ठार (Death) तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

ट्रॅव्हल बसच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार
डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना भाडेतत्वावर चालविण्यास देणार

भरत रंगनाथ पडवळ (वय 48, रा. कोतुळ पांगरी, ता. अकोले) असे मयताचे नाव आहे. पुणे-नाशिक महामार्गावर बोटा शिवारात पुलाच्या जवळ सोमवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल बस क्रमांक एम. एच. 18 बी जी 9989 ही बस भरधाव वेगाने पुण्याहून नाशिकच्या दिशेने जात होती. बोटा शिवारात बसने मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत मोटारसायकलस्वार ठार झाला तर त्याच्यापाठीमागे बसलेला सुनिल लक्ष्मण पावडे (वय 46, रा. खुंटेवाडी, ता. अकोले) हे गंभीर जखमी झाला.

ट्रॅव्हल बसच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार
‘अर्बन’च्या पुनर्जीवनासाठी सहकार्य करू

याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात बस चालक सुनिल चौधरी (रा. नंदूरबार) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रॅव्हल बसच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार
कोणत्याही परिस्थितीत जायकवाडीला पाणी जाऊ देणार नाही
ट्रॅव्हल बसच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार
हेरंब कुलकर्णींना मारणार्‍यांचे बोलवते धनी शोधा
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com