दोन दिवसात 60 झेडपी कर्मचार्‍यांच्या बदल्या

गुरूवारी तीन विभागातील 9 कर्मचार्‍यांचा समावेश
दोन दिवसात 60 झेडपी कर्मचार्‍यांच्या बदल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना संसर्गामुळे (Covid 19 contagion) जिल्हा परिषद (Zilla Parishad) कर्मचार्‍यांच्या यंदा समुपदेशनाने ऑनलाईन बदल्या (Online transfers) करण्यात येत आहेत. मंगळवारी पहिल्या दिवशी 49 कर्मचार्‍यांच्या बदल्या (Staff transfers) करण्यात तर काल गुरूवारी दोन विभागातील (Department) 11 कर्मचार्‍यांच्या बदलीची प्रक्रिया (transfer process) पूर्ण करण्यात आली आहे.

यंदाच्या बदली प्रक्रियेत प्रशासकीय बदल्याचे प्रमाण कमी असल्याने विनंती आणि आपसी बदल्या करून प्रशासन कर्मचार्‍यांची सोय करत आहे. पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन, अर्थ आणि कृषी विभागातील (Department of Agriculture) कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्यानंतर काल लघू पाटबंधारे विभागातील (Minor Irrigation Department) प्रशासकीय एक बदली, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील एक प्रशासकीय बदली आणि पशू संवर्धन विभागातील (Department of Animal Husbandry) पशूधन पर्यवेक्षक यांची एक प्रशासाकीय, सहा विनंती आणि 2 आपसी अशा 9 बदल्या करण्यात आल्या. यामुळे जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) सहा विभागातील अवघ्या 60 कर्मचार्‍यांच्या बदल्या झाल्या असून अलिकडच्या वर्षातील हे प्रमाण सर्वात कमी असण्याची शक्यता आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com