पशु वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदल्या

नगर जिल्ह्यातील दहा जणांचा समावेश
पशु वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बदल्या

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagr

पशुसंवर्धन विभागातील (Department of Animal Husbandry) पशुधन विकास अधिकारी (Livestock Development Officer) गट अ या सवर्गातील नाशिक विभागातील (Nashik Department) सुमारे 39 जणांच्या बदल्या (Transfer) करण्यात आल्या आहेत. त्यात अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) दहा अधिकार्‍यांचा समावेश आहे.

नेवाशातील वडाळ्याचे डॉ. संदीप वाजे (Newasa Vadala Dr. Sandip Waje), श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव (Shrirampur Ukkalgav) येथे रिक्त पदावर नियुक्ती. कोपरगाव पंचायत समितीतील डॉ. दिलीप दहे (Kopargav Dr. Dilip Dahe) यांची कोपरगाव येथे डॉ. श्रध्दा काटे (Dr. Shradha Kate) याच्या बदलीने रिक्त होणार्‍या पदावर नियुक्ती. कोळपेवाडीचे डॉ. करण खर्डे (Kolpewadi Dr. Karan Kharde) यांची राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे. पारनेरच्या डॉ. हर्षला ठुबे (Parner Dr. Harshala Thube) यांची पुणे येथे, सिन्नरचे डॉ. विष्णू लहामटे अकोलेतील देवगाव येथे बदलून आले आहेत.

देवगावचे डॉ. संतोष पिचड (Devgav Dr. Santosh Pichad) यांची दिंडोरीत, कोपरगावच्या डॉ. श्रध्दा काटे कोपरगाव पंचायत समितीत डॉ. दहे यांच्या बदलीने रिक्त होणार्‍या जागेवर आल्या आहेत. सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटेचे डॉ. प्रसाद शेळके अकोलेतील शेंडी येथे बदलून येत आहेत. अळकुटीचे डॉ. संकेत भोर (Alkuti Dr. Sanket Bhor) संगमनेरातील जवळे कडलग येथे, अकोलेतील शेंडी येथे कार्यरत डॉ. सपना नेहे Akole, Shendi Dr. Sapana Nehe) यांची बदली सिन्नर येथे, तर टाकळीमियाचे डॉ. वैभव वाकडे (TakaliMiya Dr. Vaibhav Vakade) याची बदली राहुरी तालुक्यातील सोनगाव येथे करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com