अहमदनगर (प्रतिनिधी) -

प्रभारी आयुक्त तथा कलेक्टर राजेंद्र भोसले यांनी महापालिकेत खांदेपालट केला. उपायुक्तांना कामकाज वाटप करण्यासोबतच

काही अधिकार्यांच्या बदल्या करत लहारेंना उद्यान विभागाचा तर त्यांच्या जागी अशोक साबळे यांना आस्थापना विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

प्रभारी आयुक्त भोसले यांनी काल शुक्रवारी रात्री बदल्यांचे हे आदेश जारी केले. मेहेर लहारे यांच्याकडे आस्थापना विभागाचा पदभार असताना तक्रारीमुळे ते वादग्रस्त झाले होते. भोसले यांनी त्यांची उचलबांगडी करत त्यांना उद्यान विभागाची जबाबदारी दिली आहे.

तीन नंबर प्रभाग समितीचे प्रमुख असलेले अशोक साबळे यांच्याकडे आस्थापना विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तीन नंबर प्रभाग समिती प्रमुख म्हणून अंबादास सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक आयुक्त एस.डी.राऊत यांची उपायुक्त डांगे यांना सहाय्य तर एस.बी.लांडगे यांची उपायुक्त पठारे यांना सहाय्य म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

डांगे यांच्याकडे कर, तर पठारेंकडे सामान्य प्रशासन

तत्कालीन उपायुक्त सुनील पवार यांची बदली झाल्यानंतर रिक्त पदावर यशवंत डांगे यांची नियुक्ती झाली. प्रभारी आयुक्त भोसले यांनी डांगे यांच्याकडे उपायुक्त (कर) आणि उपायुक्त प्रदीप पठारे यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी सोपविली आहे.