कापडबाजारात वाहतूक कोंडी

कापडबाजारात वाहतूक कोंडी

अहमदनगर | प्रतिनिधी

दिवाळी सणाच्या निमित्ताने शहर व उपनगरात खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारात गर्दी करताना दिसत आहेत.

शहराचा मध्यवर्ती व्यापारी भाग असलेल्या कापडबाजार, गंज बाजार, मोची गल्ली, चितळे रोड, माणिकचौक, सर्जेपुरा या ठिकाणी सकाळी ११ वाजेपासून ते रात्री १० पर्यंत अनेक वेळा वाहतूक कोंडी निर्माण होते.

दीपावली खरेदीच्या निमित्ताने होणारी वाहतूक कोंडी होणार नाही याचे नियोजन शहर वाहतूक शाखाने काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. परंतु त्यांचेकडून ढिसाळ नियोजन होत असल्याने खरेदीकरिता बाहेर पडलेले नागरिक त्रस्त झाले आहेत.

तेलीखुंट ते कापडबाजार, भिंगारवाला चौक हा मार्ग एकेरी वाहतुकीचा आहे. मात्र, अनेक उत्साही तरुण व बेजबाबदार नागरीक नियमांचा भंग करून नो एन्ट्रीमध्ये घुसतात. येथे वाहतूक पोलीस असतात मात्र अनेकदा तेही याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसते.

पोलिसांना वाहतुकीचे नियमन, नियोजन, कायदा आणि त्याची अंमलबजावणी यांचे प्रशिक्षण दिले जाते. मनपा हद्दीत असलेल्या सिझलचा ही उपयोग होत नाही, पोलिस हजर असेल तरच नागरिक शिस्त पाळतात नसेल तर सिगल न पाहणारे अनेक महाभाग आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com