व्यापार्‍याच्या गोडावूनमधून सोयाबीनची चोरी

व्यापार्‍याच्या गोडावूनमधून सोयाबीनची चोरी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

राहाता तालुक्यातील (Rahata) वाकडी (Wakdi) येथील भुसार मालाच्या व्यापार्‍याच्या गावातील शेडमधील गोडावूनमधून 300 गोण्यापैकी 26 गोण्या सोयाबीन (Soybeans) अज्ञात चोरट्यांनी (Theft) चोरुन नेली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात (Shrirampur Police Station) गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. या घटनेतील तोंड बांधलेले चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.

व्यापार्‍याच्या गोडावूनमधून सोयाबीनची चोरी
गडकरींच्या आश्वासनानंतर निलेश लंकेंचे उपोषण मागे

राहाता तालुक्यातील (Rahata Taluka) वाकडी येथील भुसार मालाचे व्यापारी श्री. कोते यांच्या गोडावूनमध्ये ठेवलेल्या 300 सोयाबीन (Soybeans) गोण्यांपैकी 26 गोण्या चोरून नेण्याचा प्रकार काल उघडकीस आला आहे. काल दि. 9 डिसेंबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास दुकान उघडले असता ठेवलेल्या गोण्या कमी असल्याचे दिसून आले. त्यानंतर कोते यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तोड बांधलेले दोन अज्ञात चोरटे सोयाबीनच्या (Soybeans) गोण्या शेडच्या भिंतीच्या वरून बाहेर टाकत असल्याचे दिसले. सोयाबीनच्या (Soybeans) 68 हजार 900 रुपये किंमतीच्या 26 गोण्या या चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.

व्यापार्‍याच्या गोडावूनमधून सोयाबीनची चोरी
दहशत व सुडाचे राजकारण

याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात (Shrirampur Police Station) श्री. कोते यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांविरूद्ध श्रीरामपूर तालुका पोलिसात भादंवि कलम 34, 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहेत.

व्यापार्‍याच्या गोडावूनमधून सोयाबीनची चोरी
ऊसाचे पाचरट दिले नाही म्हणून एकास मारहाण
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com