व्यापार्‍यांचे प्रश्न चर्चेतून सोडवू- राकेश ओला

व्यापार्‍यांचे प्रश्न चर्चेतून सोडवू- राकेश ओला

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

येथील मर्चंट असोसिएशनच्यावतीने व्यापार्‍यांची बैठक बोलवावी, त्यास आपण उपस्थित राहून मार्गदर्शन करू तसेच व्यापार्‍यांचे प्रश्न चर्चेतून सोडवू, असे आश्वासन जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी व्यापार्‍यांना दिले.

जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी श्रीरामपूर येथील शहर पोलीस स्टेशनला भेट दिली असता मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राहुल मुथा यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी उपस्थित होते.

जिल्हा पोलीस राकेश ओला म्हणाले, मला श्रीरामपूरची व व्यापार्‍यांची चांगली माहिती आहे. आपल्याला काही दैनंदिन अडचणी आहेत. याबाबत मी स्वतः येऊन व्यापार्‍यांची बैठक घेऊ, यात तुमच्या काही अडचणी असतील, मागणी असेल त्या चर्चेतून सोडवू, आमचे आपणास सहकार्य राहील, आपणही पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, काही अडचणी असतील तर थेट मला नगरला येऊन कार्यालयात भेटा, असे त्यांनी सांगितले.

मर्चंटचे अध्यक्ष राहुल मुथा म्हणाले, व्यापार्‍यांच्यावतीने आम्हाला आपला सन्मान करायचा आहे. तसेच व्यापार्‍यांच्या अडचणीबाबत चर्चा करायची आहे, यासाठी आपण आमच्या मर्चंट असोसिएशनला भेट द्यावी.

यावेळी मर्चंटचे सेक्रेटरी प्रेमचंद कुंकूलोळ, संचालक सुनील गुप्ता, मुकेश कोठारी, बाळासाहेब खाबीया, निलेश ओझा, राजेश कासलीवाल, नितीन ललवाणी, निलेश बोरावके, सोमनाथ मुंदडा, संजय गाडेकर, गौतम उपाध्ये, वर्धमान पाटणी, मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष पत्रकार रमण मुथ्था, पद्माकर शिंपी, करण नवले, अनिल पांडे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com