व्यापार्‍याची ट्रकचालक व मालकाने केली सव्वातेरा लाखांची फसवणूक

20 टन सोयाबीनच्या 396 गोण्या पोहच न करता लावली परस्पर विल्हेवाट || नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
व्यापार्‍याची ट्रकचालक व मालकाने केली सव्वातेरा लाखांची फसवणूक

भानसहिवरा |वार्ताहर| Bhanashivare

नेवासा तालुक्यातील (Newasa Taulka) भानसहिवरा (Bhanashivara) येथील व्यापार्‍याने (Traders) धुळे (Dhule) येथील व्यापार्‍याकडे माळीचिंचोरा फाटा (Mali Chichora) येथून ट्रकमधून पाठविलेले सव्वा तेरा लाख रुपये किंमतीचे सोयाबीन (Soybean) पोहच न करता त्याची ट्रकचालक (Truck Driver) व मालकाने परस्पर विल्हेवाट लावून फसवणूक (Fraud) केल्याची घटना घडली असून याबाबत व्यापार्‍याच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) ट्रकचालक व मालकावर फसवणुकीचा (Fraud) गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे.

याबाबत सुमित अनिल गुंदेचा (वय 32) धंदा-व्यापार रा. भानसहिवरा ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी भानसहिवरा येथे कुटूंबियांसह एकत्र राहतो. आम्ही धान्य खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. माझे माळीचिंचोरा फाटा येथे आडतचे दुकान असून ते चालवतो.

8 जानेवारी 2022 रोजी रात्री सव्वाआठचे सुमारास मी श्री गुरुदत्त ट्रान्सपोर्ट अहमदनगर यांचे मालक पोपट रामभाऊ कोलते रा. अहमदनगर यांच्या मालट्रक (एमएच 18 बीजी 6994) मध्ये 22 टन 470 किलो वजनाच्या प्रतिक्विंटल 6 हजार 625 रुपये किंटल दराच्या सोयाबीनच्या 426 बॅगा (एकूण किंमत 14 लाख 88 हजार 667 रुपये) एवढा माल भरुन सदर मालट्रक दिशान अ‍ॅग्रोटेक कंपनी धुळे (Dhule) येथे रवाना केला. तेव्हा या ट्रकवर चालक प्रसाद संतोष कराडे, ज्ञानेश्वर संतोष कराडे व ट्रकमालक संतोष बारकू कराडे (सर्व रा. दहेगाव ता. मनमाड) हे होते.

9 जानेवारीला सोयाबीन बॅगा पोहचल्या की नाही याबाबत मालट्रकच्या मालकाकडे फोनवरुन चौकशी केली असता माल पोहचला नाही. ट्रक दुरुस्तीचे काम मनमाड (Manmad) येथे चालू असल्याचे सांगितले. 10 तारखेला ट्रकमालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा ट्रान्सपोर्टचे मालक पोपट रामभाऊ कोलते यांना घेवून मनमाड (Manmad) येथे ट्रकलमालक संतोष कराडे याच्या घरी गेला तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. 11 जानेवारी रोजी दुपारी 12 च्या सुमारास जीपीएस (GPS) प्रणालीद्वारे मालट्रक मनमाड शिवारात उभा असल्याची माहिती मिळाली.

आम्ही ट्रकमालकास घेवून ट्रकजवळ गेलो तेव्हा ट्रकचालक ज्ञानेश्वर संतोष कराडे हा ट्रकसह मिळून आला. ट्रकची मागील ताडपत्री उघटून पाहिली असता त्यामध्ये सोयाबीनच्या 30 बॅगा शिल्लक राहिलेल्या होत्या. उर्वरीत सुमारे 20 टन वजनाच्या 13 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या 396 सोयाबीन बॅगांची त्यांनी परस्पर विल्हेवाट लावली होती. तेव्हा त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी काहीएक माहिती सांगितली नाही. चालक ज्ञानेश्वर संतोष कराडे व ट्रकमालक संतोष बारकू कराडे यांना घेवून नेवासा पोलीस ठाण्यात आलो. सव्वातेरा लाख रुपये किंमतीच्या 20 टन सोयाबीनच्या 396 बॅगा कंपनीकडे पोहच न करता परस्पर विल्हेवाट लावून विश्वासघात करुन फसवणूक केली.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी (Newasa Police) गुन्हा रजिस्टर फस्टर 33/2022 भारतीय दंड विधान कलम 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com