व्यापार्‍यांना मारहाण; आजचा शिरसगाव बाजार बंदचा इशारा

व्यापार्‍यांना मारहाण; आजचा शिरसगाव बाजार बंदचा इशारा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शिरसगाव येथील आठवडे बाजारात व्यापार्‍यांना मारहाण करणार्‍या आरोपींना अटक करून कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी येथील मंगळवारचा (आज) आठवडे बाजार बंद ठेवण्याचा इशारा भाजीपाला आडतदार व व्यापार्‍यांनी दिला आहे.गेल्या मंगळवारी (दि. 26 जुलै) शिरसगाव येथील आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीस आणलेल्या व्यापार्‍यांना काही टारगटांनी मारहाण केली.

या बाबत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. परंतु या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. हे आरोपी स्थानिक असून त्यांच्यापासून इतर व्यापार्‍यांनाही मारहाण होऊ शकते, अशी भिती व्यापार्‍यांमध्ये आहे. त्यामुळे या आरोपींना अटक करून कडक कारवाई करावी. या मागणीसाठी आज दि. 2 ऑगस्टचा आठवडे बाजार बंद ठेवण्याचा इशारा अमोल शेटे, राहुल बागुल, विकास अमोलिक, संजय जाधव, गोरक्षनाथ कडू, गणेश वाडेकर, शंकर बनसोडे, राहुल हिवाळे, सुधाकर कदम, इम्रान बागवान आदींसह व्यापार्‍यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com