श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

बेलापूर येथील व्यापारी गौतम हिरण यांच्या हत्याप्रकरणात अटकेत असलेल्या पाच आरोपींना तीन दिवस (22 मार्च) पोलीस कोठडी

वाढवून देण्यात आली आहे.

1 माच रोजी संध्याकाळी बेलापूर येथील बायपास येथून हिरण यांचे अपहरण करण्यात आले होते. 7 दिवसानंतर वाकडी शिवारात त्यांचा कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी सिन्नर जवळून 5 आरोपींना अटक केली. यात हिरण यांच्याकडे कामाला असलेल्या नोकराच्या मुलाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. तपास अधिकारी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी याचा तपास केला. आरोपींनी ज्या गाडीत हिरण यांचे अपहरण केले. ती गाडी पोलिसांना सापडली असून या गाडीत आरोपीनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे इंधन भरल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने काल (शुक्रवारी) त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींंनी गाडीत इंधन कोणाच्या कार्डवरुन टाकले याची माहिती मिळण्यासाठी तसेच मोबाईलचे कॉल व त्याची माहिती मिळविण्यासाठी पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी आज येथील न्यायालयात केली. यापुर्वी आरोपींना 7 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली असल्याने पुन्हा पोलीस कोठडीची गरज नाही, असे आरोपीच्या वकीलांनी सांगितले. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर न्या. रॉय यांनी आरोपीना 22 पर्यंत पोलीस कोठडी दिली. आरोपीच्यावतीने अॅड. अरिफ शेख यांनी काम पाहिले तर सरकारपक्षातर्फे अॅड. राठोड यांनी काम पाहिले.