सोनई |वार्ताहर| Sonai
सोनई येथील लांडेवाडी रस्त्यावरील श्रीराम चौकात डबल ट्रॉली असलेल्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून 14 वर्षे वयाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली.
यााबाबत माहिती अशी की, सोनई येथील गरीब कुटुंबातील स्वच्छता कर्मचारी बाबासाहेब कांबळे यांचा मुलगा शुभम बाबासाहेब कांबळे (वय 14) हा रविवारी सायंकाळी सहा वाजता दूध आणण्यासाठी सायकलवर जात असताना भरघाव वेगातील डबल ट्रॉली असलेल्या वीट भट्टीची वाहतूकीच्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला.
यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या जमावाने ट्रॅक्टर पेटवून देण्याचा प्रयत्न केला असता माजी सरपंच दादासाहेब वैरागर व सहाय्यक फौजदार राजेंद्र थोरात, पोलीस पथकाने जमलेल्या ग्रामस्थांची समजूत घालून जमावाला शांत करत आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिले. पोलिसांनी पंचनामा करुन ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात नेला. रात्री आठपर्यंत घटनास्थळी मोठा जमाव तळ ठोकून होता.