ट्रॅक्टरखाली चिरडून युवक ठार

ट्रॅक्टरखाली चिरडून युवक ठार

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील नागलवाडी (Nagalwadi) शिवारामध्ये शेतात काम चालू असताना ट्रॅक्टर (Tractor) मागे घेताना चालकाचा ताबा सुटून एक युवक चिरडून ठार (Death) झाल्याची घटना घडली आहे.

विठ्ठल रमेश शिंगटे (25ख नागलवाडी, ता. कर्जत) असे या अपघातात ठार (Accident Death) झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी येथील शेतकरी रमेश शंकर शिंगटे यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये (Karjat Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुार त्यांच्या शेतामध्ये माती ट्रेलर मध्ये भरण्याचे काम सुरू असताना. ट्रेलर ट्रॅक्टरला (Tractor) जोडला जात होता. यावेळी विठ्ठल शिंगटे हा ट्रेलरचा सुकाणु धरून उभा होता.

तर ट्रॅक्टर (Tractor) चालक बळीराम नानासाहेब नलावडे यांनी त्यासाठी ट्रॅक्टर मागे घेताना त्यांचा अचानक ताबा सुटल्याने ट्रॅक्टर जोरात मागे येऊन त्याठिकाणी उभा असणारा विठ्ठल शिंगटे यांच्या पोट आणि छाती वरून ट्रॅक्टरचे मोठे टायर गेले. यामुळे तो जागेवरच मरण पावला. याप्रकरणी रमेश शिंगटे यांच्या तक्रार अर्जावरून चालक बळीराम नलावडे याच्याविरोधात कर्जत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com