ट्रॅक्टरच्या धडकेत पादचारी जखमी

ट्रॅक्टरच्या धडकेत पादचारी जखमी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने धडक दिल्याने पादचारी जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास गुंजाळवाडी फाट्याजवळ घडली.

रमेश धोंडीबा काळे (वय 42, रा. कासारवाडी) मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास गुंजाळवाडी फाट्या जवळून पायी जात असताना वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरने त्यांना धडक दिली. या अपघातात रमेश काळे जखमी झाले. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक पसार झाला. याबाबत काळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी रावसाहेब बाळासाहेब खतोडे (वय 42, रा. कासार दुमाला) याच्याविरुद्ध गुन्हा र.न. 646/,2021 भादंवि. कलम 279, 337, 338 मोटार वाहन कायदा 184, 134 (र) (ल) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल टोपले करीत आहेत. तालुक्यातील कासारा दुमाला परिसरात सुरू असलेल्या वाळू उपशातून हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com