ट्रॅक्टर पलटी होऊन एक ठार

ट्रॅक्टर पलटी होऊन एक ठार

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

तालुक्यातील राजूरी येथील अवघड वळणावर विटांच्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात एक जण ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना रविवारी (दि.23) दुपारी घडली. शिवाजी संपत काळे ( 60, रा. पाटोदा (गरडाचे) ता. जामखेड असे अपघातातील मृताचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगवी येथून बांधकामासाठी आवश्यक असलेल्या विटा ट्रॉलीत भरून एक ट्रॅक्टर खर्ड्याकडे चालला होता. हा ट्रॅक्टर राजूरी जवळील उतारावर ब्रेक न लागल्याने विटांच्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर पलटी झाला. यावेळी विटांवर बसलेले काळे हे खाली पडून ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अजय साठे हे करत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com