कालव्यात ट्रॅक्टर झाला पलटी; चालकाचा मृत्यू

कोठे घडली घटना ?
कालव्यात ट्रॅक्टर झाला पलटी; चालकाचा मृत्यू

अकोले |प्रतिनिधी|Akole

अकोले (Akole) तालुक्यातील म्हाळादेवी (Mhaladevi) येथे निळवंडे कालव्यात (Nilwande Canal) ट्रॅक्टर पलटी (Tractor Overturned) झाल्याने यात चालकाचा दुर्देवी मृत्यू (Driver Death) झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. विजय गणपत हासे (वय 45) असे मयत ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.

कालव्यात ट्रॅक्टर झाला पलटी; चालकाचा मृत्यू
अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी यांची नियुक्ती

म्हाळादेवी (Mhaladevi) येथील शेतकरी विजय हासे हे सकाळी दर्यातील शेताची नांगरणी करण्यासाठी गेलेले होते. तेथील काम उरकल्यानंतर ते घराकडे निळवंडे कालव्याच्या (Nilwande Canal) रस्त्याने येत होते. त्याचवेळी त्यांचे ट्रॅक्टरवरील (Tractor) नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट कालव्यात पलटी झाला. या ट्रॅक्टरखाली चालक विजय हासे दबल्या गेल्याने त्यांचा मृत्यू (Death) झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अकोले ग्रामीण रुग्णालयात (Akole Rural Hospital) शवविच्छेदन करण्यासाठी हलविले.

कालव्यात ट्रॅक्टर झाला पलटी; चालकाचा मृत्यू
दहशतीचे राजकारण जिल्हा खपवून घेणार नाही, हे झाकण लवकरच उडणार

अकोले पोलिसांनी (Akole Police) या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल म्हाळादेवी सह परिसरात शोककळा पसरली आहे. मयत विजय हासे यांच्यावर सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, सहा मुली, एक मुलगा, आई, वडील, तीन बहीनी असा परिवार आहे.

कालव्यात ट्रॅक्टर झाला पलटी; चालकाचा मृत्यू
अवैध सावकारीच्या 557 तक्रारीत तथ्यच आढळले नाहीत!
कालव्यात ट्रॅक्टर झाला पलटी; चालकाचा मृत्यू
राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे पगार वाढले
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com