टॉवरची तोडफोड करून 32 लाखांचे साहित्य चोरले

शेंडीतील घटना || एमआयडीसी पोलिसांत गुन्हा
Crime
Crime

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेंडी (ता. नगर) शिवारातील 180 फुट (50 मीटर) टॉवरची तोडफोड करून 32 लाख 50 हजार रूपये किंमतीचे साहित्य चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना सन 2018 ते जून 2021 च्या दरम्यान घडली असून या प्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल नानाभाऊ शिंदे (रा. तपोवन रोड, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

शेंडी शिवारात असलेल्या टॉवरची चोरट्यांनी तोडफोड केली. यामधील बॅटरी, डिझेल जनरेटर, एसएमपी, पीआययु, एअर सेल बीटीएल, आरएफ केबल, तसेच टॉवर शेजारी सिक्युरिटीसाठी उभारण्यात आलेली रूम नष्ट करून त्यातील एसी व इतर उपकरणे चोरट्यांनी चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com