Corona
Corona
सार्वमत

कोपरगावात डॉक्टरसह एकजण करोना पॉझिटिव्ह

Nilesh Jadhav

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी | Kopergaon

शहरातील स्वामी विवेकानंदनगर मधील 62 वर्षीय डॉक्टर व तालुक्यातील रवंदा येथील 60 वर्षीय पुरुष अशा दोघांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे कोपरगाव शहरासह तालुक्यातील करोना बाधित रुग्णांचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोपरगाव तालुक्यातील 14 व्यक्तींचे स्राव रॅपिड डायग्नॉस्टिक किटद्वारे तपासण्यात आले.त्यामध्ये शहरातील विवेकानंदनगर येथील कान, नाक, घसा तज्ञ 62 वर्षीय डॉक्टर व रवंदे येथील 60 वर्षीय पुरुष करोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर 12 जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज करोना बाधित आलेले रवंदे येथील 60 वर्षीय पुरुष हे येवला येथे लग्न समारंभास जाऊन आले होते. शहरातील डॉक्टर यांना स्वतःला करोनाची लक्षणे जाणवल्यामुळे त्यांनी करोना टेस्ट करावी अशी माहिती दिली होती. त्यात त्यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

कोपरगाव तालुक्यातील करोना बाधितांची संख्या 32 झाली असून त्यापैकी एक महिला मयत झाली आहे तर 19 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर उर्वरित 12 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com