राहुरीत तोतया पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले

भूलभुलैय्या करून अडीच तोळ्याचे दागिने लंपास
राहुरीत तोतया पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

बँक खात्यातील पैसे (Bank Account Money) काढण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला पोलीस येतील, अशी बतावणी करून अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने (Gold jewelry) लंपास केल्याचा प्रकार काल राहुरी (Rahuri) शहरातील नवी पेठेमध्ये भरदिवसा घडल्याने खळबळ उडाली आहे.

राहुरीतील स्टेशनरोड (Rahuri Station Road) येथे राहणार्‍या जलसंपदा विभागातील (Department of Water Resources) सेवानिवृत्त कर्मचारी श्रीकृष्ण रघुनाथ अळसुंदेकर (वय 75) हे नवीपेठेतील दुसर्‍या मजल्यावर असणार्‍या महाराष्ट्र बँकेच्या शाखेच्या खालीच असणार्‍या ग्राहक सेवा केंद्रात पैसे काढायला गेले असता आधीच पाळत ठेवणार्‍या दोघांनी आळसुंदेकर गाडी लावत असताना त्यांना हटकत आम्ही पोलीस आहोत, सध्या पोलीस अधिकारी चेकींग करत असल्याने तुमच्या अंगावरील दागिने काढून ठेवा असे सांगून बतावणी केली असून आळदेकर यांनीही पोलीस आहेत, असे समजून आपल्या गळ्यातील लॉकेट आणि हातातील दोन अंगठ्या (अंदाजे एक लाख रुपये) आपल्या शबनममध्ये ठेवल्या. ग्राहक सेवा केंद्रातून पैसे काढल्यानंतर काहीवेळाने आपल्याकडील लॉकेट व अंगठ्या लांबविल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ जवळच्या लोकांना व पोलिसांना संपर्क साधला. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV footage) हा प्रकार दिसून आला आहे. उशिरा आळसुंदेकर यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यासाठी गेले.

स्टेशनरोड परिसरामध्ये रहिवासी असणारे आळसुंदेकर हे जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी असून बँक ऑफ महाराष्ट्र, राहुरी शाखेला जाण्यासाठी जीने चढावे लागत असल्याने, त्यांना ग्राहक सेवा केंद्राचा उपयोग करावा लागतो. याठिकाणी मोठ्या संख्येने ग्राहक, सेवानिवृत्त, महिला, व्यापारी, शेतकरी यांची ये-जा सुरू असते. हा भाग शहरातील गजबजलेला भाग मानला जातो. यापूर्वी नगर-कोपरगाव महामार्गावरील (Nagar-Kopargaon Highway) स्टेट बँकेसमोर पाळत ठेवून ग्राहक नागरिकांना लुटण्याचे प्रकार झाले आहेत. आता महामार्गावरील या टोळ्यांचे लक्ष शहरातील बँकामध्ये येणार्‍या ग्राहकांकडे लागल्याची चर्चा होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com