नेवासा तालुक्यातील करोना बाधितांची संख्या ९६ वर
सार्वमत

नेवासा तालुक्यातील करोना बाधितांची संख्या ९६ वर

नेवासा शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे.

Nilesh Jadhav

नेवासा | तालुका वार्ताहर | नेवासा

नेवासा शहरात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. शहरातील नगरपंचायत परिसरतील एक व्यक्ती करोना बाधित आढळून आला आहे.

शहरातील एकूण रुग्ण संख्या ६ झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अभिराज सुर्यवंशी यांनी दिली आहे.

कुकाणा येथे आढळला पहिला कोरोना रुग्ण

कुकाणा |वार्ताहर | Kukana

तालुक्यातील कुकाणा येथील एक ८५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित आढळली आहे. आज जिल्हा रुग्णालय टेस्ट लॅब कडून आलेल्या अहवालात ही ८५ वर्षीय व्यक्ती करोना बाधित आढळून आली आहे. तालुक्यातील रुग्ण संख्या ९६ वर पोहोचली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com