राहुरी तालुक्यात करोनाचा कहर सुरूच

आज दोन बाधितांचा मृत्यू
राहुरी तालुक्यात करोनाचा कहर सुरूच

राहुरी | प्रतिनिधी | Rahuri

राहुरी तालुक्यात करोनाचा कहर सुरूच आहे. तालुक्यातील दोन करोना बाधितांचा मृत्यू झाला असून आज एकाच दिवसात तब्बल

३४ जणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे आता तालुक्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ४४२ वर गेली आहे. तर बळींची एकूण संख्या १८ झाली आहे. राहुरी शहरात दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com