अकोलेत आणखी 10 करोना बाधीत, संख्या पोहचली 178 वर
सार्वमत

अकोलेत आणखी 10 करोना बाधीत, संख्या पोहचली 178 वर

Nilesh Jadhav

अकोले | प्रतिनिधी | Akole

अकोले तालुक्यात गुरुवारी दिवस भरात दहा करोना बाधित आढळून आले.त्यामुळे तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या 178 झाली आहे.

अकोले तालुक्यातील करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. संगमनेर येथील एका खासगी लॅब मध्ये इंदोरी फाट्याजवळील पती पत्नी करोना बाधित आढळले होते. सायंकाळी खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात नवलेवाडी येथील धुमाळवाडी रोडलगत असलेल्या एका कॅालनीतील एकाच कुटुंबातील 63 वर्षीय महिला, 33 वर्षिय महिला व 34 वर्षिय पुरूषाचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

तर खानापुर कोविड सेंटर येथे काल गुरुवारी घेण्यात आलेल्या रॅपिड न्टीजन टेस्टमध्ये शहरातील शिवाजी चौकातील 50 वर्षिय महिला,इंदोरी येथिल 24 वर्षीय महीला, 16 वर्षीय तरुणी व निब्रळ येथील 46 वर्षीय पुरुष,म्हाळादेवी येथील 86 वर्षीय वृद्धाचा करोना टेस्ट पॅाझिटीव्ह आली आहे. अशा प्रकारे काल दिवसभरात एकुण 10 व्यक्ती करोना बाधित आढळुन आले आहे.

तालुक्यातील रुग्णांची एकुण संंख्या 178 झाली आहे त्यापैकी 120 जण कोरोनामुक्त झाले तर 55 व्यक्तीवर उपचार सुरु आहे तर आतापर्यंत 03 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

अखेर इंदोरीत करोनाची एन्ट्री

इंदोरी वार्ताहराने दिलेल्या माहिती नुसार- शहरांमधून खेड्याकडे हात पाय पसरू पाहणार्‍या करोनाने अकोले तालुक्यातील इंदोरी मध्येही एन्ट्री केली असून काल गुरुवारी 3 व्यक्ती करोना बाधीत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे तिघे जण संपर्कात आलेल्यांचीही धाबे दणाणले आहे.

बुधवारी दुपारच्या सुमारास इंदोरी येथील एका 45 वर्षीय रूग्णास थंडी तापाचा त्रास होत असल्याने त्यांनी त्याची खाजगी चाचणी करून घेतली. त्यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना खानापूर येथील सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. बाधित रुग्ण हा गावातील मध्यवस्तीतील असल्याने करोना कमिटीने हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे तसेच बाधित रुग्णाच्या संपर्कातील नऊ जणांना तपासणीसाठी पाठवण्यात आले. याच परिसरातील 65 घरांमधील 315 ग्रामस्थांचा आरोग्य विभागामार्फत सर्वे करण्यात आला.

काल गुरुवारी दुपारच्या सुमारास इंदोरी फाट्यावरील एका पती-पत्नीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे इंदोरी मध्ये तीन जणांना करोनाने आपल्या जाळ्यात ओढले. सध्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, थंडी ताप, पांढर्‍या पेशी कमी जास्त असणे अशा आजारांनी अनेक जण आजारी असल्यामुळे अनेकांनी करोनाचा धसका घेतला आहे. बाधितांच्या संपर्कातील अनेक जणांची धांदल उडाली आहे. आरोग्य विभाग, करोना ग्राम समितीने पाहणी करून ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत विविध सूचना दिल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com