नेवासा तालुक्याने शंभरी ओलांडली
सार्वमत

नेवासा तालुक्याने शंभरी ओलांडली

"या" गावांमध्ये आढळले नवीन रुग्ण

Nilesh Jadhav

नेवासा | तालुका वार्ताहर | Newasa

तालुक्यात आज ९ करोना बाधित आढळून आले आहे. तालुक्यातील एकूण करोना बाधितांची संख्या १०५ झाली आहे.

आज आढळलेल्या बधितांमधे करजगाव येथे ५, भेंडा व जळके येथे प्रत्येकी एक तर गळनिंब येथे २ बाधितांचा समावेश असल्याची माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. अभिराज सुर्यवंशी यांनी दिली आहे.

जळके बुद्रुक येथे आढळला पहिला करोना रुग्ण

देवगड फाटा | वार्ताहर | Devgad Fhata

नेवासा तालुक्यातील जळके बुद्रुक येथील एक ३३ वर्षीय व्यक्ती करोना बाधित आढळली आहे.

जळके बुद्रुक मध्ये प्रथमच १ व्यक्ती करोना बाधित आढळली असल्याची माहिती टोका ग्रामीण रुग्णालयातचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवार यांनी दिली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com