तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी गडकरी

निरीक्षक गायकवाड नियंत्रण कक्षात
तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी गडकरी

अहमदनगर|Ahmedagar

शहरातील महत्वाचे पोलीस ठाणे असलेल्या तोफखान्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड (PI Sunil Gaikwad) यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी (PI Jyoti Gadkari) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil) यांनी मंगळवारी रात्री उशिरा याबाबत आदेश (order) काढले. दरम्यान, मंगळवारी रात्री निरीक्षक गडकरी यांनी पदभार स्वीकारला.

गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तोफखाना पोलीस ठाणे (Topkhana Police Station) चर्चेत आहे. वाढत्या गुन्ह्यांचा तपास करण्यात गुन्हे प्रगटीकरण (डिबी) शाखा अपयशी ठरल्याने दोन वेळा बरखास्त करण्यात आली होती. फिर्याद दाखल करण्यासाठी आलेल्या दोन गटांमध्ये वाद झाले होते. डिबी पथकातील एका कर्मचाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. यामुळे पोलीस ठाणे कायम चर्चेत राहिले.

निरीक्षक गायकवाड हे आठ महिन्यापूर्वी तोफखाना ठाण्यामध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत झाले होते. पोलीस अधीक्षक पाटील यांनी अचानक पणे तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक गायकवाड यांची तडकाफडकी बदली करून त्यांना नियंत्रण कक्षात (control room) आणले आहे. त्यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक गडकरी यांची नियुक्ती केली आहे. निरीक्षक गडकरी यांनी आर्थिक गुन्हे शाखेमध्ये (Economic Crimes Branch) चांगल्या पद्धतीने कारभार केलेला आहे. नगर अर्बन व शहर सहकारी बँक घोटाळा प्रकरणांमध्ये त्यांनी विशेष तपास करून आरोपींना जेरबंद करण्यामध्ये त्यांचे योगदान आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com