तोफखान्यावर टाक्या सांभाळण्याची वेळ

पुरवठा विभागाचे दुर्लक्ष
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अनधिकृत गॅस रीफिलिंग सेंटरवर (Unauthorized Gas Refilling Center) कारवाई दरम्यान जप्त (Seized) करण्यात आलेल्या गॅस टाक्या (Gas Tanks) तोफखाना पोलीस ठाण्याच्या (Topkhana Police Station) आवारात अनेक महिन्यांपासून धूळखात पडून आहेत. पुरवठा विभागाकडे (Supply Department Ignore) वारंवार पाठपुरावा करूनही या टाक्या त्यांनी ताब्यात घेतलेल्या नाहीत. त्यामुळे पोलिसांवरच या टाक्या सांभाळण्याची वेळ आली आहे.

File Photo
‘आनंदाचा शिधा’ लांबला

घरगुती गॅसचा (Gas) सर्रास गैरवापर होत असताना त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या पुरवठा विभागाकडून (Supply Department) क्वचितच कारवाई होते. तर दुसरीकडे पोलिसांकडून सातत्याने या कारवाया सुरू आहेत. मागील काही महिन्यात तोफखाना पोलिसांनी (Topkhana Police) सावेडी उपनगर परिसरात तीन मोठ्या कारवाया करत बेकायदेशीर गॅस रिफिलिंग सेंटरमधून मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस टाक्या जप्त (Gas Tanks Seized) केल्या आहेत.

File Photo
शिर्डीतूनच लोकसभा लढणार

सद्यस्थितीत तोफखाना पोलीस ठाण्याच्या (Topkhana Police Station) आवारात जप्त केलेल्या सुमारे 44 गॅस टाक्या पडून आहेत. यातील बहुतांशी टाक्यात गॅस भरलेला आहे. कारवाईनंतर पोलिसांकडून या टाक्या पुरवठा विभागाच्या ताब्यात दिल्या जातात. तोफखाना पोलिसांनी मागील काही महिन्यांपासून पुरवठा विभागाकडे टाक्या हस्तांतर करण्यासाठी सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. परिणामी, तोफखाना पोलिसांवरच या भरलेल्या गॅस टाक्या सांभाळण्याची वेळ आली आहे.

File Photo
चालक पदासाठी 26 मार्च, शिपाई पदासाठी 2 एप्रिलला लेखी परीक्षा
File Photo
काष्टी परिसरात दुध भेसळीवर एफडीएचे छापे
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com