तोफखान्याची डिबी पुन्हा चर्चेत

तोफखान्याची डिबी पुन्हा चर्चेत

काय आहेत कारणं?

अहमदनगर|Ahmedagar

सावेडी (Savedi) उपनगरात वाढत्या चोर्‍या, घरफोड्या (Thieves, Burglars), जबरी चोरीच्या घटनांमुळे तोफखाना पोलीस ठाण्याची (Topkhana Police Station) गुन्हे प्रगटीकरण शाखा (Crime Disclosure Branch) (डिबी) (DB) पुन्हा चर्चेत आली आहे. घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यात डिबीला यश येत नसल्याने डिबी प्रमुखांसह कर्मचारीही वरिष्ठांच्या रडारवर आले आहेत.

उच्चभ्रू लोकांची वसाहत व झपाट्याने वाढणार्‍या सावेडी उपनगरात गुन्हेगारांनी डोकेवर काढले आहे. या उपनगराचा भार तोफखाना पोलीस ठाण्यावर आहे. या पोलीस ठाण्यात मारहाण, खूनाचा प्रयत्न, फसवणूकीचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण जास्त आहेच, परंतु, थेट पोलीस ठाण्यात गुन्हेगार एकमेकांवर भिडल्याच्या घटना घडल्या आहेत. आता तर चोरट्यांच्या टोळीने घरफोड्या, जबरी चोर्‍या करून पोलिसांसमोर (Police) आव्हान उभे केले आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी वसंत टेकडी परिसरात पतसंस्था, बेकरी व दोन घरे फोडली. डॉ. कंक यांच्या घरातून तब्बल 10 ते 12 तोळे सोन्याचे दागिणे चोरीला (Jewelry stolen) गेले. तो गुन्हा दाखल होत नाही तोच भरदुपारी एका व्यवसायिकाचे पाच लाख लंपास केल्याची घटना घडली. विशेष म्हणजे हे लुटारू पैशाची बॅग घेऊन पोलीस ठाण्यासमोरून गेले असल्याची माहिती आहे. चोर्‍या, घरफोड्या, जबरी चोरीच्या घटना घडत असताना तोफखान्याच्या डिबीला (Topkhana DB) मात्र चोरट्यांना जेरबंद करण्यात अपयश आले आहे.

तोफखान्याची डिबी कायम चर्चेत (Artillery DB is under constant discussion) असते. चोरट्यांना जेरबंद (Arrested) करण्यात अपयशी ठरलेल्या डिबीला वरिष्ठांनी दोन वेळा बरखास्त केले होते. गेल्या एक ते दीड महिन्यापूर्वीच उपनिरीक्षक व सात कर्मचार्‍यांची नवीन डिबी स्थापन करण्यात आली आहे. या डिबीला गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश येत नसल्याने डिबी वरिष्ठांच्या रडारवर आली आहे.

डिबी, नकोच!

तोफखान्यात वाढती गुन्हेगारी लक्षात घेता डिबीमध्ये काम करणार्‍यांची डोकेदुखी वाढली आहे. वारंवार डिबी बरखास्त होत असल्याने व गुन्ह्यांचा भार लक्षात घेता डिबीत काम करण्यास कोणी तयार होत नाही. जे आहेत, त्यांच्याकडून म्हणावे तसे काम होत नाही. आता तर चोर्‍या, घरफोड्या, जबरी चोर्‍या, दरोडा या सारख्या गुन्ह्यांचा तपास डिबी प्रमुख, कर्मचार्‍यांकडे सोपविला जात असल्याने डिबीचे प्रमुखांसह, कर्मचारी हैराण झाले आहे. त्यामुळे डिबी, नकोच, अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

एसपींची भेट

मागील वेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तोफखाना पोलीस ठाण्यास भेट दिली होती. त्यावेळी डिबीकडून अपेक्षित कामगिरी न झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांनी डिबी बरखास्त करण्याचे आदेश तात्कालीन प्रभारी अधिकार्‍यांना दिले होते. आता आज (शुक्रवार) अधीक्षक पाटील तोफखान्याला भेट देेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अधीक्षक पाटील डिबीची कामगिरी तपासणार का? याची चर्चा पोलीस ठाण्यात सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com