तोफखान्यांच्या चार पोलीस कर्मचार्‍यांच्या चौकशीचे आदेश

जिल्हा रूग्णालयात ड्यूटीच्या ठिकाणी हजर नसणे भोवले
तोफखान्यांच्या चार पोलीस कर्मचार्‍यांच्या चौकशीचे आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा रूग्णालयात ड्यूटी लावलेले तोफखाना पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी ड्यूटीच्या ठिकाणी हजर नसल्याचा प्रकार समोर आला. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी रूग्णालयात भेट दिल्यानंतर त्यांच्या हे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ चारही कर्मचार्‍यांची चौकशी करून त्यांचा कसुरी अहवाल सादर करण्याच्या सूचना तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना दिल्या आहेत.

जिल्हा रूग्णालयात करोना रूग्णांवर उपचार होत असल्याने त्याठिकाणी नातेवाईकांकडून गोंधळ घातल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे तोफखाना पोलीस ठाण्यातील काही कर्मचार्यांची नियुक्ती त्याठिकाणी केली जाते. सोमवारी जिल्हा रूग्णालयात लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी झाली होती. लस संपल्यामुळे नागरिकांनी गोंधळ सुरू केला. जिल्हा रूग्णालय प्रशासनाने तेथे ड्यूटीवर असलेल्या पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास आणून दिला.

त्यावेळी एक कर्मचारी तेथे होता. त्यानेही तेथे जाण्यास नकार दिला. याची माहिती प्रशासनाने पोलीस अधीक्षक पाटील यांना दिली. यानंतर अधीक्षक पाटील यांनी रूग्णालयात भेट दिली. त्यावेळी तीन कर्मचारी त्याठिकाणी हजर नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी चारही कर्मचार्यांची चौकशी करून त्यांचा कसुरी अहवाल पाठविण्याच्या सूचना केल्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com