तोफखान्यात नव्याने गुन्हे प्रगटीकरण शाखा स्थापन

अधिकारी तेच, कर्मचारी बदलले
तोफखान्यात नव्याने गुन्हे प्रगटीकरण शाखा स्थापन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे प्रगटीकरण शाखेची (डीबी) नव्याने स्थापना करण्यात आली आहे.

या डीबीमध्ये सात जणांचा समावेश करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकी, हवालदार बार्शिकर काळे, पोलीस शिपाई जावेद शेख, सतीश त्रिभुवन, चेतन मोहिते, अनिकेत आंधळे आणि संतोष राठोड यांचा नव्याने स्थापन केलेल्या डीबीमध्ये समावेश आहे.

23 मार्च रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी तोफखाना पोलीस ठाण्यास भेट देत कामकाजाची माहिती घेतली होती. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्ह्यांच्या तपासात कोणत्याही प्रकारची समाधानकारक प्रगती न झाल्याचे अधीक्षक पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने डीबी बरखास्त करण्याची सूचना पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना केली. जुनी डीबी बरखास्त केल्यानंतर आता नव्याने डीबीची स्थापना करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आलेल्या डीबीचा कारभार तोफखाना पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक समाधान सोळंकी यांच्याकडे होता. नव्याने स्थापन होणार्‍या डीबीमध्येही सोळंकी यांच्याकडेच कारभार ठेवण्यात आला आहे.

मात्र जुने कर्मचारी घेण्यात आलेले नाहीत. नव्या डीबीचा पदभार काही दिवस उपनिरीक्षक सोळंकी यांच्याकडे ठेवला असून मे महिन्यात नव्याने अधिकारी रूजू झाल्यानंतर त्याच्याकडे डीबीचा कारभार दिला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com