तोफखाना लसीकरण केंद्रावर गोंधळ

महापौर आले आणि लसीकरण सुरू झाले
तोफखाना लसीकरण केंद्रावर गोंधळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिकेच्या वतीने शहरात करोना रूग्णांच्या उपचारासाठी प्रयत्न सुरू असून दुसरीकडे लसीकरण मोहिमही सुरू आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे नागरिक लस घेण्यासाठी गर्दी करत आहे. यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होत आहे. बुधवारी तोफखाना येथील आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, महापौर बाबासाहेब वाकळे यांना कळताच त्यांनी तेथे धाव घेतली. नागरिकांना संयमाची भुमीका पार पाडावी अशी विनंती त्यांनी केली. यानंतर बंद पडलेले लसीकरण पुन्हा सुरू झाले. महानगरपालिकेच्या माध्यमातून करोना संसर्ग विषाणूला रोखण्यासाठी रोग प्रतिकार लसीकरणाचे काम मनपा आरोग्य केंद्रामध्ये सुरू आहे. लस घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचार्यांना काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे.

बुधवारी तोफखाना आरोग्य केंद्रावर गोंधळ होताच महापौर वाकळे यांनी तेथे धाव घेत लसीकरण पूर्वत केले. यावेळी उपमहापौर मालन ढोणे, अजय ढोणे, संजय ढोणे, विकास गिते, पुष्कर कुलकर्णी, शिवा आढाव, शुभम वाकळे आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com