
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील तोंडोळी येथील शेतकर्यांचा गोठ्यातून 4 जनावरांची अज्ञात इसमाने चोरी केल्याची घटना सोमवारी (दि.12) रात्री घडली.
याप्रकरणी अनिल पांडुरंग दौंड व हरिभाऊ तुळशीराम पडळकर यांनी फिर्याद दिली असून यावरून पाथर्डी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 डिसेंबर रोजी रात्री अनिल दौंड यांनी जनावरांना चारा टाकला. त्यानंतर दुसर्या दिवशी मंगळवारी सकाळी सहा वाजता दौंड हे घराजवळील जनावरांच्या गोठ्यात झाडलोट करण्यासाठी गेले असता गोठ्यात एक गावरान गाय, व एक गावरान गोर्हे दिसले नाही.
हरिभाऊ तुळशीराम पडळकर यांचेही रात्रीच्या वेळी दोन गावरान गायी चोरी गेल्याची घटना घडली आहे. शेतकर्यांच्या पशुधनावरती चोरट्यांनी डल्ला मारल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे. सध्याच्या लम्पी आजारातून जनावरांना वाचवण्यासाठी शेतकर्याला अर्थिक अडचणीचा सामना करावा लागला.त्यात आता चोरट्याचे शेतकर्याचे पशुधन चोरीचे नवे संकट येऊ घातल्याने शेतकरी हतबल झाला आहे.