उद्यापासून बूस्टर डोस, हे आहेत नियम

प्रशासनाची तयारी : दुसर्‍या डोसनंतर 39 आठवड्यांचा कालावधी आवश्यक
उद्यापासून बूस्टर डोस, हे आहेत नियम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषद आरोग्य विभागाने सोमवार (दि.10) पासून बूस्टर डोस देण्याबाबत नियोजन केले आहे. व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस घेऊन 9 महिने किंवा 39 आठवडे झाले असतील त्यांना आधी घेतलेल्या लसीचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे. तसेच नियमाप्रमाणे आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर यांनाही हा बूस्टर डोस दिला जाणार आहे.

ओमिक्रॉनचा वाढत्या प्रादुर्भावामुळे करोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका असल्यामुळे शासनाने लसीकरणाला प्राधान्य दिले आहे. आता बूस्टर डोस देण्याचीही तयारी सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात केवळ 60 वर्षांपुढील नागरिकांना व त्यातही ज्यांना रक्तदाब, मधूमेह अशा व्याधी आहेत अशांना बूस्टर दिला जाणार आहे. दुसरा डोस घेऊन 9 महिने झाले असतील अशांनाच बूस्टर डोस मिळणार आहे. जिल्ह्यात 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटात असलेले व्याधीग्रस्त 1 लाख 14 हजार 667 जण आहेत. त्यांना सोमवारपासून नियमाप्रमाणे बूस्टर मिळणार आहे. या बुस्टर डोसेच 60 पेक्षा जास्त वयोगटातील 5 लाख 73 हजार 400, तसेच आरोग्य कर्मचारी 41 हजार 861 आणि 54 हजार 677 फ्रंटलाईन वर्क हे लाभार्थी राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

9 महिन्यांचा कालावधी आवश्यक

बूस्टर डोस देण्यासाठी शासनाने काही नियम घालून दिले आहेत. दुसरा डोस घेऊन ज्यांना 9 महिन्यांचा कालावधी झाला आहे, अशा ज्येष्ठांना, तसेच आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर यांना बूस्टर डोस दिला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com