
देवगडफाटा |वार्ताहर| Devgad Phata
नेवासा (Newasa) तालुक्यातील टोका (Toka) येथे गुरुवारी दुपारच्यावेळी दोन बंद घरांचे कडी-कोयंडे तोडून एकूण साडेपाच तोळे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) व 31 हजार 500 रुपयांची रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली. भरदुपारी घडलेल्या या घरफोडीच्या (Burglary) घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत टोका येथील योगेश बापू डावखर (वय 36) धंदा- व्यापार रा. टोका ता. नेवासा यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, 19 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वडील भेळ सेंटर व लहान भाऊ मंगेश हा शेतात निघून गेला होता. त्यानंतर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मी तसेच आई, पत्नी, भावजय व मुलाबाळांसह रांजणगावदेवी (ता. नेवासा) येथे देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गावातील मंगेश बोरुडे यानी फोन करुन सांगितले की, तुमच्या घराचा कडी-कोयंडा कोणीतरी तोडून घरातील कपाटाची उचकापाचक केलेली दिसत आहे. आम्ही लगेच घरी टोका (Toka) येथे येवून पाहिले असता आम्ही कपाटामध्ये ठेवलेले आमचे सोन्याचे दागीने (Gold Jewelry) तसेच रोख रक्कम मिळून आली नाही.
कपाटात ठेवलेले एक तोळे वजनाचे सोन्याची चार कर्णफुले, एक तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, अर्धा तोळा वजनाची सोन्याची पोत व अर्धा तोळा वजनाचे सोन्याचे लॉकेट तसेच रोख 25 हजार रुपये असा ऐवज चोरीस (Theft) गेल्याचे दिसून आले.
घरी असताना चर्चेमधून समजले की, गावातील रोहीदास हरिश्चंद्र बनकर यांचे बंद घराचा कोयंडा तोडून सकाळी 10 ते 4 या दरम्यान अज्ञात चोरट्याने कपाटामध्ये ठेवलेली एक तोळ्याची सोन्याची पोत, एक तोळ्याचे नेकलेस व अर्धा तोळ्याची सोन्याची कर्णफुले असे एकूण अडीच तोळे सोन्याचे दागिने व साडेसहा हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरीस (Theft) गेला.
अशाप्रकारे कोणीतरी अज्ञात चोरट्याने आमचे तसेच रोहीदास बानकर यांचे राहते बंद घराचा कोयंडा तोडून आत प्रवेश करुन घरात कपाटामध्ये ठेवलेले 31 हजार 500 रुपये रोख व साडेपाच तोळे सोन्याचे दागिने असा ऐवज चोरून नेला. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी (Newasa Police) घरफोडीचा गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.