पोलीस कर्मचाऱ्याचा तरुणीवर अत्याचार

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस कर्मचाऱ्याचा तरुणीवर अत्याचार

अहमदनगर (प्रतिनिधी)

तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

शकील सय्यद असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या तरुणीवर सय्यद याने अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्या तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलीस कर्मचारी सय्यद हा तोफखाना पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण (डीबी) शाखेत काम करतो. ८ ऑक्टोबरला रात्री त्याने तरुणीला कारमध्ये बसवून विळद घाट परिसरातील नंबळक बायपास रोडने निर्जन ठिकाणी आले. सय्यद याने कारमध्येच तरुणीवर जबरदस्ती करून अत्याचार केला.

तरुणी त्याला म्हणाली, तुझ्या वरोधात गुन्हा दाखल करेल. तेव्हा तो म्हणाला, मी एक पोलीस आहे. माझे अनेक मोठमोठ्या गुन्हेगारांशी संबंध आहे. तुला कापून फेकून देईल, असे म्हटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस कर्मचाऱ्याविरोधात अत्याचाराचा बुन्हा दाखल झाल्याने त्याची चांगलीच चर्चा शहर पोलीस दलात रंगली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com