श्रीरामपूर तालुक्यात 114 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर तालुक्यात 114 करोनाबाधित रुग्ण

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

श्रीरामपूर तालुक्यात आज पुन्हा 114 करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मात्र बरे होवून घरी जाणार्‍यांची

संख्या काल 127 असल्याने बरे होण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. काल 114 रुग्ण सापडले आहे. तर 1035 रुग्ण अ‍ॅक्टीव्ह असून ते वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. काल 127 रुग्ण बरे होवू न घरी गेले आहेत. जिल्हा रुग्णालयात 11 खासगी रुग्णालयात 55 तर अ‍ॅन्टीजन तपासणीत 48 असे रुग्ण आढळून आले आहेत. यात काल 127 जणांना बरे वाटले म्हणून घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपूर तालुक्रात एकूण 1035 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या काही दिवसात सुमारे 4596 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 2475 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. तर सध्या एकूण अंदाजे 1035 रुग्ण विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

काल शहरात 38 तर ग्रामीण भागात 62 अन्य 14 असे 114 रुग्ण आहेत. यात शहरात वॉर्ड नं. 1-11, वॉर्ड वॉर्ड नं. 2-02, वॉर्ड नं. 3-04, वॉर्ड नं. 4-01, वॉर्ड नं. 5-01, वॉर्ड नं. 6-03, वॉर्ड नं. 07-16 असे 38 तर ग्रामीण भागात उंबरगाव-03, शिरसगाव-04, उक्कलगाव-01, माळेवाडी-01, बेलापूर-03, दत्तनगर-04,

फत्याबाद-01, भेर्डापूर-01, वडाळामहादेव-01, हरेगाव-01, शिरसगाव-05, कारेगाव-01, माळवाडगाव-02, खिर्डी-01, कुरणपूर-02, खंडाळा-02, नायगाव-01, गोंधवणी-06, खोकर -01, ब्राम्हणगाव वेताळ-02, उंदिरगाव-03, महांकाळवाडगाव-02, पाचवाडी-01, निपाणीवडगाव-01, पढेगाव-06, निमगावखैरी-05, गोेंडगाव-01 एकूण 62 तर बाहेर तालुक्यातील 9 तसेच मोबाईल नंबर व पत्ता चुकीचे दिलेले 5 असे एकूण 14 रुग्ण आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com