नगर जिल्ह्यात करोनाचे तांडव; 102 रुग्णांचा मृत्यू

आज आतापर्यंतच्या सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद
नगर जिल्ह्यात करोनाचे तांडव; 102 रुग्णांचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत करोना मृत्यूचे तांडव असल्याचे प्रशासनाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. एकाच दिवसात जिल्ह्यात 102 करोना रुग्णांचा बळी गेला असून यामुळे एकूण करोना मृतांच्या संख्येने दीड हजारांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात करोना बाधित होण्याची टक्केवारी ही 22.83 टक्के असून यामुळे उपचार सुरू असणार्‍यांची संख्या आता 20 हजारांच्या टप्प्यावर पोहचली आहे. तर रुग्ण बरे होण्याची टक्केवारी घसरून 84.22 टक्के झाली आहे.

दरम्यान, रविवारी रात्री जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केलेल्या खुलाशात जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 39 करोना मृत्यू झालेला आहे. गेल्या एप्रिलपासून सरकारच्या कोविड पोर्टलवर करोना मृत्यूंच्या नोंदी अपलोड होणे बाकी होते. ही आकडेवारी अपलोड झाल्याने रविवारी मृतांच्या आकडेवारीत 102 ने वाढली आहे. महापालिकेच्या अमरधाममधील रेकॉर्डनुसार जिल्ह्यात करोना मृतांची दैनदिन संख्याही सरासरी 40 असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात काल 2 हजार 312 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 14 हजार 642 झाली आहे. रुग्ण बरे होण्याच प्रमाण हे आता 84.22 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, रविवारी नव्याने 3 हजार 592 नवे करोना रुग्ण सापडले असून यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 19 हजार 905 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 713, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 967 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 912 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 176, अकोले 67, जामखेड 48, कर्जत 70, कोपरगाव 26, नगर ग्रामीण 52, नेवासा 30, पारनेर 36, पाथर्डी 58, राहाता 21, राहुरी 32, संगमनेर 11, शेवगाव 7, श्रीगोंदा 29, श्रीरामपूर 7, कँटोन्मेंट बोर्ड 28, मिलिटरी हॉस्पिटल 12 आणि इतर जिल्हा 2 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 380, अकोले 25, जामखेड 3, कर्जत 08, कोपरगाव 21, नगर ग्रामीण 68, नेवासा 9, पारनेर 15, पाथर्डी 23, राहाता 81, राहुरी 13, संगमनेर 135, शेवगाव 14, श्रीगोंदा 26, श्रीरामपूर 22, कँटोन्मेंट बोर्ड 29 आणि इतर जिल्हा 94 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 1 हजार 912 जण बाधित आढळुन आले. मनपा 293, अकोले 97, जामखेड 29, कर्जत 81, कोपरगाव 97, नगर ग्रामीण 227, नेवासा 167, पारनेर 73, पाथर्डी 114, राहाता 210, राहुरी 157, संगमनेर 71, शेवगाव 132, श्रीगोंदा 44, श्रीरामपूर 69, कॅन्टोन्मेंट बोर्ड 20 आणि इतर जिल्हा 31 अशा रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीत जिल्ह्यात करोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या 1 हजार 480 होती. यात रविवारी 102 ने वाढ झाल्याने करोनाबळींची संख्या आता 1 हजार 582 झाली आहे.

मनपा हद्द 849, नगर ग्रामीण 347, राहाता 312, संगमनेर 217, नेवासा 206, राहुरी 202, पाथर्डी 195, अकोले 189, कर्जत 159, शेवगाव 153, कोपरगाव 144, अन्य जिल्हा 127, पारनेर 124, श्रीगोंदा 99, श्रीरामपूर 98, जामखेड 80, भिंगार 77, लष्कर 12 आणि अन्य राज्य 2 असा आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com