नगर : जिल्हयात आज ७१९ रुग्ण करोनामुक्त

जिल्हयात आज पर्यंत २६ हजाराच्या वर रूग्ण बरे
नगर : जिल्हयात आज ७१९ रुग्ण करोनामुक्त

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्हयात आज ७१९ रूग्ण करोनामुक्त झाले आहे. आज त्या रुग्णांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील एकूण करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २६ हजार १५६ इतकी झाली आहे.

आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ३०९, संगमनेर ०६, राहाता ३२,पाथर्डी १३, नगर ग्रा. ५७, श्रीरामपूर २४, कॅन्टोन्मेंट ०७, नेवासा ०६, श्रीगोंदा २२, पारनेर ३४, अकोले ०४, राहुरी ३३, शेवगाव ७३, कोपरगाव ४३, जामखेड २१, कर्जत २४, मिलिटरी हॉस्पिटल ११ समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com