झेडपीच्या सर्वसाधारण सभेत निम्म्याहून अधिक विषय अवलोकनार्थ

मंगळवारी होणारी जेबी गाजण्याची चिन्हे
झेडपीच्या सर्वसाधारण सभेत निम्म्याहून अधिक विषय अवलोकनार्थ

अहमदनगर (प्रतिनिधी)-

जिल्हा परिषदेची मंगळवारी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण होणार आहे. या सभेच्या विषय पत्रिकेवर 42 विषय ठेवण्यात आलेले असून यातील जवळपास 19 विषय हे सभागृहा समोर अवलोकनार्थ ठेवण्यात आलेले आहेत. यामुळे सदस्यांमध्ये नाराजी असून यामुळे मंगळवारी होणारी सर्वसाधारण सभा जागण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होणार आहे. दर तीन महिन्यांनी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण होते. उद्या होणारी सभा ही सदस्यांसाठी शेवटची सर्वसाधारण सभा ठरण्याची शक्यता आहे. साधारण जानेवारीत जिल्हा परिषद निवडणुकीची शक्यता आहे. दरम्यान, उद्या होणार्‍या सभेत विषय पत्रिकेवर 42 विषय असून यातही 19 विषयांना अध्यक्षांनी मंजूरी दिलेली असून ते केवळ सभागृहाच्या माहितीसाठी सभेत ठेवण्यात आलेले आहेत. यामुळे सदस्यांमध्ये नारजी आहे. मागील सभेत जिल्हा परिषदेच्या सभागृहाने एकमताने अध्यक्षांना काही विषयांवर निर्णय घेण्याचे अधिकार एकमताने दिले होते. त्या संधीचा पुरेपूर फायदा अध्यक्षांनी घेतला असल्याचा सूर आता सदस्यांमधून आवळण्यात येत आहे. यामुळे उद्या होणार सभेकडे जिल्हा परिषद वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

झेडपीच्या शाळेचे खासगी जागेत बांधकाम

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर न होता, खागसी ठिकाणी सुरू असल्याची तक्रार बोधेगावचे माजी सरपंच राम अंधारे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केलेली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेची किंमत ही 30 ते 35 कोटी रुपये असून जागेवर हित संबंध ठेवून अन्य खासगी जागेत बांधकाम करण्यात येत असल्याचा आक्षेप अंधारे यांनी घेतला असून या विषयावर सर्वसाधारण सभेत चांगलीच चर्चा होण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com