कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची वडिलांची परंपरा मुलाने राखली

माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरेंवर साधला निशाणा
कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची वडिलांची परंपरा मुलाने राखली

आरडगाव (वार्ताहर)-

राहुरी तालुक्यात पोलीस खात्यांचा सर्वसामान्य लोकांना त्रास सुरू आहे. आमच्या कार्यकर्त्यांवर खोटेनाटे गुन्हे दाखल करून त्यांना कोठडीत डांबून ठेवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

लोकांची अडवून करण्याची वडिलांची परंपरा मुलाने कायम ठेवली. त्यामुळे आम्हाला आता आमचे हत्यार बाहेर काढावे लागेल. असा निशाणा माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरेंवर साधला.

राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथे जिल्हा बँकेच्या सहकार्याने सेवा संस्थेच्या वतीने शेतकर्‍यांना पशुधनासाठी खेळते भांडवल उपलब्ध करून 45 लाख रुपये कर्जवाटपाचा कार्यक्रमप्रसगी श्री. कर्डिले बोलत होते. अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष शिवाजी खडके होते.

तांदुळवाडी सोसायटीच्या सभासदांना व शेतकर्‍यांना प्राथमिक स्वरूपात माजी आमदार कर्डिले यांच्या हस्ते कर्जवाटप करण्यात आले.

कर्डिले म्हणाले, आमच्या काळात मंजूर झालेल्या ट्रान्सफार्मरचे आता मंत्री उद्धघाटन करीत फिरत आहेत. आत्तापर्यंत राज्यात मंत्र्यांकडून ट्रान्सफार्मरचे उद्घाटन होताना पाहीले नव्हते. पण उद्धघाटन करण्यासाठी यांच्याकडे काहीच उरले नाही. म्हणून ते ट्रान्सफार्मरचे उद्घाटन करीत फिरत आहेत, हे हास्यास्पद असल्याची टीका कर्डिले यांनी केली.

याप्रंसगी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक रवींद्र म्हसे, साहेबराव तोडमल किशोर वने, उत्तम म्हसे, शहाजी जाधव, सुरेश बानाकर, अनिल आढाव, गणेश खैरे, नारायण धागुडे, इंद्रभान पेरणे, मच्छिंद्र चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष विनीत धसाळ, अविनाश पेरणे, विक्रम पेरणे, महेश महाराज खाटेकर, जब्बार पठाण, भैय्या शेळके, साहेबराव म्हसे, चंद्रकांत गावडे, कानिफनाथ धसाळ, संतोष धसाळ, अजित डावखर, सुखदेव खाटेकर, रामभाऊ पेरणे, अशोक काळे, बापूसाहेब धसाळ, सोपान पेरणे, संजय निमसे, आदींसह सोसायटीचे संचालक, सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com