तिसगावात जमावाकडून वाहनांची तोडफोड

तिसगावात जमावाकडून वाहनांची तोडफोड

करंजी |प्रतिनिधी| Karanji

तिसगाव येथे महिलेला चारचाकीचा धक्का लागल्याच्या कारणातून शाब्दीक चकमकीनंतर जमावाने वाहनांची तोडफोड केल्याची घटना सोमवारी (दि.31) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. येथील एक महिला नगर पाथर्डी रस्त्यावरील वृद्धेश्वर तालुका दूध संघापासून घराकडे जात असताना नगर कडून येणार्‍या एका चार चाकी वाहनाची या महिलेला धडक बसली. त्अपघात झाल्याची माहिती समजल्यानंतर घटनास्थळी नागरीक गोळा झाले.

या घडलेल्या अपघातानंतर संबंधित चार चाकी वाहनातील व्यक्ती व तिसगाव मधील तरुणांमध्ये शाब्दिक चकमक उडाली याचे पर्यवसन तरुणांमध्ये सिनेस्टाईल हाणामारी झाली. या हनामारीमध्ये अपघातग्रस्त चार चाकी वाहना सोबत असलेल्या इतरही दोन चारचाकी वाहनावर संतप्त जमावाने दगडफेक केली व या दगडफेकीत तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले. तसेच वाहनांमधील तरुण देखील जखमी झाले.

तिसगावमध्ये झालेल्या हाणामारीची माहिती पाथर्डी पोलिसांना मिळताच पोलीस उपनिरीक्षक कौशल्यनिरंजन वाघ यांच्यासह पोलीस घटनास्थळी धाव घेतली. पोलीस दाखल होताच जमावाने काढता पाय घेतला. या घटनेबाबत पाथर्डी पोलिसात मात्र अध्यापक गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु या रात्री झालेल्या हाणामारीची तिसगावसह परिसरात मात्र जोरदार चर्चा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com