तिसगावच्या कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; दोघांवर गुन्हा

तिसगावच्या कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; दोघांवर गुन्हा

करंजी |प्रतिनिधी| Karanji

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे शुक्रवारी रात्री संत नागेबाबा संस्था शाखेच्या शेजारी अनधिकृतपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर पातळी पोलिसांनी छापा टाकून दोघा जणांना अटक केली आहे.

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कौशल्यनिरंजन वाघ यांनी ही कारवाई केली आहे.

यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आलेल्या गोमांसाचा पंचनामा करण्यात आला. गोवंश सदृश्य जनावरांचे मांस बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ठेवणारा इरफान गफुर शेख व अस्लम हनीफ शेख (रा. रविवार पेठ, तिसगाव ता पाथर्डी) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

गोवंशसदृश्य जनावरांची कत्तल करुन त्यांचे मांस विक्री करण्याच्या उद्देशाने मांस व कातडी बाळगताना मिळुन आल्या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड यांच्या फिरदीवरून पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com