तिसगाव येथे अल्पवयीन मुलीची छेड

विनयभंग प्रकरणी एकास अटक
तिसगाव येथे अल्पवयीन मुलीची छेड

करंजी |प्रतिनिधी| Karanji

तिसगाव येथे आजीबरोबर शेतात गवत घेण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला तिच्या जवळ येऊन तिची छेड काढणार्‍या एका तरुणाच्या विरोधात पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

शहबाज पठाण (रा. तिसगाव, ता. पाथर्डी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिसगाव येथील एक अल्पवयीन मुलगी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आजीबरोबर तिसगाव जवखेडे रोडवरील तिच्या काकांच्या शेतामध्ये गवत घेत असताना तिथे शहबाज या अल्पवयीन मुलीचा हात धरून तिची छेडछाड करू लागला. घाबरलेल्या मुलीने त्याठिकाणी आरडाओरड केली जवळच गवत घेत असलेल्या आजीने त्या मुलीचा आवाज ऐकून तिच्या मदतीला धावून आली.

आजी आलेले पाहताच या तरुणाने येथून पळ काढण्याचा प्रयत्न केला व तू जर कोणाला काही घरच्या लोकांना सांगितले तर तुझ्यासह तुझ्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी या तरुणाने या मुलीला दिली. यापूर्वी देखील दोन-तीन महिन्यांपूर्वी तिसगाव शिरापूर रोडवर वृद्धेश्वर विद्यालयात शाळेला येत असताना याच तरुणाने काही शालेय विद्यार्थिनींची त्यांचा रस्ता अडवून त्यांची छेड काढली व त्यावेळी देखील त्याला पोलिसांनी अटक केली होती.

त्याच्या घरचे कुटुंब गरीब आहे म्हणून काही लोकांनी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला परंतु हा तरुण वारंवार गावातील मुलींना एकटे पाहून त्यांची छेड काढण्याचे प्रकार सातत्याने करत असून एखादी मोठी दुर्दैवी घटना घडण्या अगोदरच या विकृत तरुणाला पोलिसांनी चांगला धडा शिकवावा जेणेकरून त्याच्याकडून पुन्हा पुन्हा असे कृत्य होणार नाही, अशी संतप्त भावना तिसगाव येथील ग्रामस्थांमधून केली जात आहे.

मुलीची छेड काढणार्‍या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून कायद्याच्या चौकटीतून त्याची लवकर सुटका होणार नाही, या दृष्टिकोनातून पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे.

- कौशल रामनिरंजन वाघ, पोलीस निरीक्षक.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com